ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या दलित वस्ती व इतर कामान मधे चौकशी मधे भ्रष्टाचारी आढळून आले दोषी
सावळदबारा ग्रामपंचायत चे माजी सरपंच कोलते व गुत्तेदार हेच निघाले भ्रष्टाचारी
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
माजी सरपंच कोलते आणि ग्रामविकास अधिकारी यांचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस होण्याची शक्यता आहे मात्र ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत चे मत्वाचे शासकीय रेकॉर्ड व इतर कागद पत्रे गायब असल्या मुळे ग्रामपंचायत चा कारभार पूर्ण पणे चव्हाट्या वर आलेला आहे
दिनांक २४ / १२ / २०२४ रोजी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पत्रकार जब्बार तडवी यांनी सोयगाव पंचायत समिती येथे अशी तक्रार दाखल केली होती कि सावळदबारा ग्रामपंचायत येथे माजी सरपंच व ग्रामविकास अधिकारी आणि गुत्तेदार ( ठेकेदार ) यांनी मिलिभगत संगनमत करून ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अनेक कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दाखल केली असता या तक्रार ची दखल घेत सोयगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश पत्र काढले असता पं. सं. सोयगाव चे विस्तार अधिकारी दौड यांनी दिनांक २९ / १ / २०२५ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार चौकशी केली असता कें. प्रा. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधलेले शौचालया वरती अंदाज पत्र प्रमाणे पूर्ण खर्च झालेला असून या कामाचे बिल हे पूर्ण काढण्यात आले मात्र अंदाज पत्रकानुसार माजी सरपंच कोलते, व ग्रामविकास अधिकारी भालेराव आणि गुत्तेदार यांनी या कामात शौचालया ला कोणतीही टाईल्स ( फर्ची ) बसविण्यात आलेली नाही दरवाजा, खिडकी, पाण्याची टाकी, नळ कनेक्शन आढळून आले नाही असे चौकशी मधे सिद्ध झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे तथा जिल्हा परिषद शाळे च्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक चे पूर्ण नित्कृष्ट दर्जाचे बोगस काम झालेले आहे याची ही चौकशी करण्यात आली मात्र हे काम कोणत्या योजने मधून झालेले आहेत याचा मात्र अभिलेख प्राप्त झालेला नाही असे सांगण्यात आले तसेच ग्रामपंचायत च्या बाजूचे शौचालय तथा स्नान गृह यात ही मोठा भ्रष्टाचार आढळून आलेला आहे या कामात ही टाईल्स ( फर्ची ) दरवाजे खिडक्या पाण्याची टाकी नळ कनेक्शन केलेले नाही कोणती ही पाईप लाईन फिटिंग नाही या ठिकाणी शौचालया साठी व स्नान गृहा साठी इस्टीमेट नुसार टाकं बांधलेले नाही थातूर मातूर बोगस नित्कृष्ठ दर्जाचे अपूर्ण काम करून मात्र काम पूर्ण दाखवून पूर्ण बिल रक्कम काढून घेतलेले आहे तसेच दलित वस्ती तील सिमेंट रोड हा इस्टीमेट नुसार किंवा कृती आराखडा नुसार झालेला नाही या सिमेंट रोड च्या कामात इस्टीमेट मधे वेगळी गल्ली व वेगळे रहिवाशी दाखविण्यात आले मात्र चौकशी दरम्यान दुसरेच रहिवाशी हजर करून दाखविण्यात आले काही लोकांच्या नावावरती जागा सुद्धा नाही तरी त्यांना समोर करून हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न राजकीय पुढारी तसेच गुत्तेदार करीत आहे खाटीक गल्ली दलित वस्ती ही कृती आराखड्यात एकच आहे मात्र हा सिमेंट रोड हा इतर मालकी च्या प्लॉटिंग गट क्रमांक क्षेत्रात बनविण्यात आला ही वस्ती दलित वस्ती खाटीक गल्ली नसून जनरल वस्ती मधे हा निधी खर्च करण्यात आला या वस्ती चा कृति आराखड्यात कोणती ही नोंद नाही हा सिमेंट रोड हा कृती आराखडा प्रमाणे नसून चुकीच्या ठिकाणी घेण्यात आला अशी तक्रार या अगोदर अकरा ते बारा दलित बांधवांनी पंचायत समिती सोयगाव येथे अगोदर तक्रार दाखल केलेली आहे मात्र ही तक्रार याच भ्रष्टाचारी यांच्या सांगण्या वरून ही चौकशी दाबन्यात आली व कोणती ही कारवाई झालेली नाही तसेच घोडेस्वार बाबा दर्गाह च्या कामात अपूर्ण काम करून भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी मधे स्पष्ट झालेले आहे सावळदबारा ग्रामपंचायत च्या कामान मधे माजी सरपंच कोलते व गुत्तेदार, तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी संगणमत करून अपूर्ण काम करून खोटे कागत पत्र दाखवून तसेच खोटी माहिती देऊन मात्र बिल पूर्ण काढून खाल्ले गेले आहेत हा घोटाळा सन २०२० — २१ ते सन २०२२ या कार्यकाळात झालेला असल्याचे दिसून येत आहे आहे माजी सरपंच कोलते आणि गुत्तेदार यांनी सावळदबारा गावच्या विकास योजनेचा पैसा सर्रास पणे लूटमार करून लाखो रुपयांचा घोटाळा अपहार करून हा गंभीर प्रताप केलेला आहे माजी सरपंच तथा गुत्तेदार यांनी ग्रामपंचायत चा निधी हा स्वतःचे किराणा दुकान तसेच स्वतःची पान टपरी समजून पदाचा गैर वापर करून हुकूमशाही पद्धतीने हा घोटाळा केलेला आहे यांना कायद्या आणि वरिष्ठ अधिकारी यांचा कोणताच धाक वाचक उरलेला दिसून येत नाही या घोटाळे बाज ग्रामविकास अधिकारी, माजी सरपंच तथा गुत्तेदार यांनी ग्रामपंचायत च्या आर. ओ. फिल्टर योजने मधे तसेच ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा विहीर योजने मधे भ्रष्टाचार घोटाळा करून यात ही पैशांचा अपहार करून हा गाव विकास कामाचा पैसा स्वतःच्या खिशात व घरात भरण्याचे काम केलेले आहे आणि
या कालावधी मधे नेमके सरपंच व गुत्तेदार कोण आहे याचा लवकरच खुलासा होऊन समोर येणार होते परंतु या माजी सरपंच तथा गुत्तेदार यांना असे वाटू लागले कि आपण मनमानी करून हुकूमशाही पद्धतीने जे घोटाळे केलेले आहे हे उघडकीस येणार तर या माजी सरपंच आणि गुत्तेदार यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय रेकॉर्ड दस्तायवज महत्वाचे बिल इस्टीमेट. एम. बी. हे ग्रामपंचायत मधून यांच्या कार्यकाळात गायब झालेले आहे हे भ्रष्टाचार करणारे ग्रामपंचायत चे रेकॉर्ड चोरणारे नेमके हे चोर कोण आहे यांच्या वरती वरिष्ठ अधिकारी कारवाई कधी करणार माहिती अधिकार मधे यांचे काळे कारनामे समोर आलेले आहे पंचायत समिती सोयगाव गटविकास अधिकारी यांच्या आदेशा खाली विस्तार अधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी केली असता या चौकशी मधे हे भ्रष्टाचारी माजी सरपंच.तथा गुत्तेदार आणि ग्रामविकास अधिकारी यांची पोलखोल झालेली असून हे या चौकशी मधे यात हे दोषी आठळुन आलेले आहेत पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करणाऱ्या आणि ग्रामपंचायत मधील शासकीय रेकॉर्ड दस्तएवज गायब करणाऱ्या चोरांवरती लवकरात लवकर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी या भ्रष्टाचाऱ्यां वरती कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांच्या कडून इशारा देण्यात आला आहे