नगरपंचायत चा मनमानी कारभार, मार्च अखेर म्हणून वीस लाख रुपयांची उधळपट्टीचा घाट, काम होऊ देणार नाही- अंकुश पगारे

प्रतिनिधी संतोष गर्दे
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.24- शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये फेव्हर ब्लॉग बसविण्याचे काम ठेकेदाराने सुरू केल्याची माहिती मिळताच समाजसेवक तथा रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी वार्ड क्रमांक 14 मध्ये तात्काळ भेट देऊन रहिवाशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठेकेदाराशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून काम बंद करण्यास सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी,नगर पंचायत सोयगाव विविध विकास योजने अंतर्गत शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये फेव्हर ब्लॉग बसविणे 14:00 लक्ष रु,सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे 10:लक्ष रु व अल्पसंख्याक महिलांसाठी शौचालय बांधकाम करणे 19:00 लक्ष रुपये अशा विविध विकास कामांचे फलकाचे अनावरण माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दि.30 जून 2024 रोजी करण्यात आले होते. मात्र नगर पंचायत कडून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा घाट घातल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विकासाला स्थानिक नागरिकांचा विरोध नाही परंतु नागरिकांचे म्हणणे आहे अगोदर गटारीचे काम करावे त्यानंतर पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन चे काम झाल्यानंतर फेव्हर ब्लॉग बसविण्यात यावे जेणेकरून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही.मात्र नगर पंचायत मार्च अखेर सुरू असल्याने सत्तेचा दुरूपयोग करून दोन दिवसात फेव्हर ब्लॉग बसवून 20 लक्ष रुपये वसूल करण्यासाठी घाट घातल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच समाजसेवक तथा रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी जनतेच्या पैशांचा सदपयोग व्हावा यासाठी ठेकेदारास काम बंद करण्याची सांगितले. अगोदर पाणीपुरवठा पाईपलाईन चे काम हाती घ्यावे त्यानंतर सिमेंट काँक्रीट गटार बांधकाम झाल्यानंतर फेव्हर ब्लॉग बसविण्यात यावे यामुळे जनतेच्या पैशांचा चुराडा होणार नाही.विकासास आमचा विरोध नाही परंतु मनमानी कारभार व जनतेच्या पैशाची लूट ज्या ठिकाणी होईल त्याठिकाणी अंकुश पगारे सदैव जनते सोबत राहतील असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी अंकुश पगारे यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले.