कुपोषण आढावा बैठकीत तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी केल्या मार्गदर्शक सूचना–
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.25- तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी मनीषा मेने-जोगदंड यांनी दि.25 मंगळवारी तालुक्यातील फरदापुर येथील अंगणवाडीस भेट दिली यावेळी गंभीर तीव्र कुपोषण व सौम्य तीव्र कुपोषण लाभार्थी बालकांची सुधारणा विषयी आढावा बैठक घेतली.बैठकी दरम्यान कुपोषित मुलांच्या आरोग्य व पोषणासाठी अंगणवाडी सेविका,पालक यांनी बालकांना पोषक आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.अंगणवाडी तील बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी सर्वांनी तत्पर राहत कार्य करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल डोके यांनी अंगणवाडी तील बालकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चावडा,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रियदर्शनी पवार,आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती तमखाने,आरोग्य सेवक कदम,अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती.