आज जिल्हा परिषद केंद्र शाळा वाकोद येथे ग्रंथदिंडी वृक्षदिंडी ज्ञान पंढरीची वारी अतिशय उत्साहात काढण्यात आली..
दीपक गायकवाड प्रतिनिधी.. वाकोद ..आज जिल्हा परिषद केंद्र शाळा वाकोद येथे ग्रंथदिंडी वृक्षदिंडी ज्ञान पंढरीची वारी अतिशय उत्साहात काढण्यात आली
या दिंडीमध्ये या सर्व गावकरी, वारकरी, टाळकरी, माळकरी विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी या सर्वांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला सर्वात प्रथम वृक्षारोपण करून दिंडीची सुरुवात झाली. गावातील मा . जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी पालखी पूजन करून पालखी सोहळ्यात सुरुवात झाली.
पालखीमध्ये गावातील सर्व कीर्तनकार भजनी मंडळी महिला मंडळी लहान-मोठे ज्येष्ठ आणि थोर पालखी सोहळ्या त सहभागी झाले पालखीचे खांदेकरी गावचे पोलीस पाटील संतोष देठे व सरपंच पती दीपक गायकवाड उपसरपंच प्रकाश गाढवे हे होते.
श्री संतोष पाटील सर यांनी ग्रंथांचे आणि वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दीपक गायकवाड, शिक्षणप्रेमी विनोद राऊत व निलेश पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. तसेच गावातील सर्व भक्तगण ह भ प कृष्णा महाराज वानखेडे, बाळकृष्ण महाराज वानखेडे, नितीन महाराज बोरुडे,अनिल सोने,स्वप्निल देठे.. राजू महाराज जोशी
पालखीची सांगता जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री विजयजी सरोदे साहेब यांच्या हस्ते आरतीने संपन्न झाली.
सदर दिंडीमध्ये स्वच्छता पाळा रोगराई टाळा झाडे लावा झाडे जगवा मुले शिकवा मुली शिकवा असे सामाजिक संदेश देण्यात आले.
सदर दिंडी यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली