टिटवी येथे 14 वर्षा च्चा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराविरोधात पती पत्नी अटकेत..

निवृत्ती चिखले व सविता निवृत्त चिखले यांच्या वर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अपराधा बद्दल फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

सोयगाव ता..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सोयगाव तालुक्यातील टिटवी येथील रहिवासी आरोपी निवृत्ती चिखली व सविता निवृत्ती चिखली दोन्ही राहणार टिटवी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी निवृत्ती चिखले या आरोपीने त्यांच्या नात्याचा फायदा घेऊन यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही त्यांची भाची असल्याची माहिती असून तिच्यासोबत 20/06/2025 ते 28/06/2025 च्चा दरम्यान टिटवी येथे लैंगिक अत्याचार केले व सदरची बाब यातील महिला आरोपी पत्नी सविता निवृत्ती चिखले राहणार टिटवी हिला माहिती असून देखील तिने ते लपवून ठेवले वारंवार होणाऱ्या अत्याचार असय्ह झाल्याने पीडित मुलींनी आपल्या मावशीला याबाबत सांगितले त्यानंतर मावशीने नातेवाईक सोबत घेऊन फर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या विरोधात बाललैंगिक संरक्षण अधिनियम कायद्यानुसार दिनांक 30/06/2025 सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपीस जेरबंद करण्यात आल आहे पुढील तपास पीएसआय पाटील व तपास अधिकारी पीएसआय सुडके मॅडम हे करीत आहे