ावळदबारा ग्रा. पं. अंतर्गत झालेल्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार दाबण्यात भा.ज.पा चे माजी सरपंच, यांना आले यश

चौकशी अहवाल छ.संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयात धुळखात पडून

*छत्रपती संभाजीनगर जिल्हा ब्युरो चीफ जब्बार तडवी*

मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित साहेब उघडा डोळे बघा नीट सावळदबारा ग्रा. पं. अंतर्गत झालेल्या दलित वस्ती व इतर कामात भाजपा. चे भ्रष्टाचारी,माजी सरपंच,आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगन मत करून माजवला भ्रष्टाचाराचा तांडव यांच्या वरती कधी होणार कारवाई थेट. कुठं तरी पाणी मुरलं कीं काय त्याच मुळे कारवाई होत नाही की काय ? कारवाई होत नसल्यामुळे चिरी मिरी चा संशय व चर्चान्ना उधाण
सोयगाव तालुक्याला भ्रष्टाचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्या मुळे लागलय भ्रष्टाचाराचे ग्रहण सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत मध्ये २०२०-२१–२२ या कालावधी मध्ये माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी तसेच काही झिरो सरपंच व लबाड दलाल गुत्तेदार यांनी मिली भगत करून ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या चौदा वित्त आयोग.पंधरा वित्त आयोग तसेच दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा भ्रष्टाचार करून गावाच्या विकासाच्या पैशाला लावला चुना माजी सरपंच तथा गुत्तेदार हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव तंत्र निर्माण करून ही चौकशी दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तसेच काही चिरी मिरी देऊन ही हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न हे भ्रष्टाचारी चोर प्रयत्न करीत आहे सध्याला घोटाळेबाज भ्रष्टाचारी यांना भाजपा पक्षाचा मोठा फायदा लाभ होत आहे कदाचित त्याच मुळे हे आफात खोर भ्रष्टाचारी घोटाळेबाज यांचे घोटाळे दाबन्यात यश येताना दिसून येत आहे या घोटाळे बाज यांच्या साठी कायदा नाही का ? यांना सध्याला कुणाचाच धाक उरलेला दिसून येत नाही त्याच मुळे हुकूमशाही पद्धतीने हे घोटाळे बाज लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करीत आहे सावळदबारा येथील अनुसूचित जाती चे दलित बांधव यांनी सोयगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये दोन वर्षांपूर्वी दलित वस्ती सिमेंट रोड च्या कामामध्ये पाच लक्ष रुपयाच्या कामात घोटाळा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु माजी सरपंच,व ग्रामविकास अधिकारी तथा झिरो सरपंच, व गुत्तेदार यांनी चिरी मिरी देऊन हि तक्रार गायब करून टाकण्यात आली या तक्रारची कोणतीही चौकशी कारवाई झालेली नाही ती तक्रार कचरा कुंडी मधे बाहेर फेकून देण्यात आल्याचे तक्रारदार यांनी सांगितले त्या नंतर महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी दिनांक २४ / १२ / २०२४ रोजी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सोयगाव पंचायत समिती कार्यालय येथे दाखल केली असता
गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी चौकशी चे आदेश पत्र जारी केले असता दिनांक २९ / १ / २०२५ रोजी विस्तार अधिकारी ए. एन. दौड यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला असता या ठिकाणी. जिल्हा परिषद शाळेतील शौचालय, ग्रामपंचायत शौचालय. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झालेले आढळून आले अपूर्ण काम करून बिल पैसा मात्र पूर्ण काढण्यात आला तसेच जी.प. शाळेतील पेवर ब्लॉक मधे तसेच घोडेस्वार बाबा दर्गाहच्या कामात या ठिकाणी घोटाळे करण्यात आलेले आहे.तसेच दलित वस्ती मधे सिमेंट रोड चे काम हे कृती आराखडा प्रमाणे काम न करता खाटीक गल्ली दलित वस्ती मधे हा निधी खर्च न करता गावठाण मधे काम न करता मालकीच्या शेतात गट क्रमांक सर्वे नंबर च्या जनरल वस्ती मधे दिशाभूल करून हा निधी वळविण्यात आला आणि नियमांचे उल्लंघन करून काम करण्यात आलेले आहे असा अहवाल प्राप्त झालेला आहे त्याच अनुषंगाने कारवाई साठी हा अहवाल जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयात पाठविण्यात आलेला असल्याचे पंचायत समिती गटविकास अधिकारी दादाराव अहिरे व विस्तार अधिकारी दौड यांनी सांगितले ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अनेक कामान मधे लाखो रुपयांचा घोटाळा भ्रष्टाचार आढळून आलेला आहे माजी सरपंच यांनी पदाचा गैर वापर करून दादागिरी मनमानी हुकूमशाही पद्धतीने हा प्रकार केलेला आहे मात्र तरीही अद्याप कोणतीही कारवाई या भ्रष्टाचारी दोशीन वरती कारवाई झालेली नाही दोन ते अडीच महिन्यां पासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालय येथे हा चौकशी अहवाल धूळ खात पडून आहे नेमका हा चौकशी अहवाल या कार्यालयात धुळखात पडून आहे.का ?.कीं हा अहवाल तक्रार अर्जा प्रमाणे कचराकुंडीत फेकला गेला अशी शंका आता निर्माण होत असून अशी चर्चा सद्याला सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सुरु आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे या अहवाला नुसार या भ्रष्टाचारी माजी सरपंच. ग्रामविकास अधिकारी, तथा गुत्तेदार यांच्या वरती कधी कारवाई करणार तसेच कोणती कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे