संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे सोयगाव बसस्थानक येथे पाणपोई सुरू

सोयगाव,दि.१५(प्रतिनिधी संतोष गर्दे
संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे अध्यक्ष राजेंद्र आहीरे यांच्या वतीने सोयगाव बसस्थानक येथे मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व शितल पाण्याची सेवा सुरू केली.दि.१४ सोमवार रोजी सोयगाव बस आगार प्रमुख मनिष जवळेकर,वाहतूक निरीक्षक सतिश अंभोरे व विजय आहीरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक अशोक काकडे,समाजसेवक संजय शहापूरकर,कृषी भूषण अरुण सोहणी,नगरसेवक तथा पत्रकार राजू दुत्तोंडे,तालुका समादेशक अधिकारी संदीप सुरडकर,राजू बाविस्कर वाहतूक नियंत्रक,ज्ञानेश्वर वाडेकर वाहतूक नियंत्रक,कृष्णा शेवाळकर,पत्रकार रवींद्र काटोले,योगेश बोखारे,संदिप सोहनी,समाजसेवक विष्णू मापारी,समाजसेवक डिंगाबर वाघ,गोंविद आहीरे,अमोल सोहनी,हरीश सोहनी,आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो:-