स
ोयगाव तहसील कार्यालयातजिल्हा पुरवठा विभागाकडुन देण्यात येणार्या राशन कार्डसाठी
प्रतिनिधि संतोष गर्दे
सर्व सामान्यांचे हाल
होतांना दिसून येत आहे. सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करत पुरवठा विभागाकडुन राशन कार्ड धारकांना तहसिलदचे उंबरठे झिजवावे लागत आहे. दुसरीकडे राशन दुकानदारांकडे कागदपत्रे जमा करा त्यांच्याकडुनच नविन राशन कार्ड अथवा नाव वाढविण्याची प्रक्रीया करण्यात येणार असल्याची सुचना पुरवठा विभागात लावण्यात आलेल आहे.
सर्व्हर डाऊनमुुळे सामान्यांचे हाल होताहेत की, हा पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि दलालांमधील ताळमेळासाठी पुढे केलेले सोपे कारण आहे हे मात्र गेल्या पंधरा दिवसात आलेले अर्ज आणि जारी केलेल्या राशनकार्ड यांच्या तपासणीअंती स्पष्ट होईल. पुरवठा विभागात असलेल्या सुचनेनुसार जर नविन राशनकार्ड साठी अथवा नाव वाढविण्यासाठी राशन दुकानदारांकडे जायचे म्हटल्यास राशन दुकाने ही कधी सुरु असतात आणि कधी बंद हे सर्वपरिचीत आहे. त्यातल्या त्यात एखादं वेळेस राशन दुकान खुली आढळल्यास दुकान चालकाकडुन नविन राशन कार्ड धारकांना तहसिलमधून अर्ज घेऊन या, नंतर तेथे जमा करा, हे सध्या होणार नाही, जमा करुन ठेवा जेव्हा होईल तेव्हा कळवितो. अशी एकना अनेक उत्तरे मिळतात. या गंभीर विषयाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून नविन राशनकार्ड साठी तहसीलचे उंबरठे झिजवणार्यां सर्व सामन्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सोयगाव तालुक्यातील रेशन कार्ड धारधारकांकडून होत आहे.