*अती दुर्गम भागातील टिटवी शिवारातील आदिवासी शेतकऱ्यावर शासनाचा अन्याय*
धरण क्षषेत्रात भुमी अभिलेख विभागामार्फत 18 मार्च रोजी परत पाहणी
करण्यात आली…
गट क्रमांक 29 चा तिढाकाही
सुटेना परिस्थितीचे कायम
शेतकरी नाराज
सोयगाव तालुक
प्रतिनिधी संतोष गर्दे..
सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेड शिवारामधील मोठ्या धरण क्षेत्रात साठवण तलावाचे नव्याने काम सुरू आहे या धरण क्षेत्रातील तलावामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेत आधिग्रहण झाले आहे अशा आदिवासी शेतकऱ्यांची शेतीची साठवण तलाव मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून गट क्रमांक 29 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव होते व ते शेत धरण क्षेत्रात अधिकरण करण्यात आले आहे त्याच शेतकऱ्यांचे नाव कमी करून त्यांची मोजणीच केली नाही अशी माहिती व तक्रार दिनांक 4 12 2024 रोजी उपविभागीय अधिकारी सिल्लोड येथे दिली होती त्या अनुषंगाने व उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व वन विभागाचे सर्व कर्मचारी दिनांक 18 मार्च मंगळवार रोजी टिटवी धरण क्षेत्राची जमीन मोजण्यात आली होते टिटवी पळसखेड शिवारामधील चालू असलेला साठवण तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून सुद्धा त्यांना सातबारा यातून कमी करण्यात आले आहे त्या शेतीची खोटी मोजणी करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयाने शेती मोजणी मधून वगळण्यात आले होते तरी भूमी अभिलेख कार्यालयाने परत मोजण्यात आलेल्या या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा काय न्याय मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना अडचणी येऊ नये म्हणून फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सावळदबारा बीट जमादार तडवी पोलीस कर्मचारी नेवरे महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता व वन विभागाचे अधिकारी अजिंठा वनपरिक्षेत्र दोडके सर वनपाल खतीफ सर वन विभागाचे अधिकारी व सर्व संबंधित शेतकरी उपस्थित होते
शेतकरी,(टिटवी,)
शब्बीर तडवी
भूमि अभिलेख अधिकारी फक्त पाहणी करून येऊन गेले
जोपर्यंत आमच्या गट क्रमांक 29 चा तिढा सुटत नाही व आम्हा आदिवासी शेतकऱ्यांना आमच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शासनाने धरणाचे काम बंद करावे हि शासनाला विनंती