ेत्या दीड वर्षात वाकोद ला शेतीसाठी ,पिण्यासाठी मुबलक पाणी देणार : मंत्री गिरीश महाजन
—————————————–
वाकोद येथे श्रीराम मंदिर सभामंडम भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन
——————————–
वाकोद ता जामनेर प्रतिनिधी संतोष गर्दे
जलसंपदा खात्याच्या माध्यमातून वाकोद सह परिसरातील गावासाठी पिण्याबरोबरच शेतीसाठी देखील मुबलक पाणी येत्या दीड वर्षात उपलब्ध करून देईल असे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीश महाजन यांनी येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजन तसेच पंढरपूर साठी मोफत वारकरी यात्रा अशा दोन्ही कामाच्या शुभरभाप्रसंगी वाकोद वासियांना दिले तसेच प्रभू श्रीराम मंदिरासाठी नव्याने 1 कोटी रु इतका निधी मिळाला असून त्याचे कामही सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच पंढरपूर यात्रेसाठी शुभेच्छा देत युवकांना अध्यात्माकडे वळा व्यसन करू नका , तुमच्या आरोग्याची जबाबदारी मी घेतो असेही प्रतिपादन ना महाजन यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
कार्यक्रमाचे प्रास्तवीक पोलीस पाटील संतोष देठे यांनी केले यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते संजय गरुड , जे के चव्हाण , प्रदीप लोढा राजधर् पांढरे डॉ प्रशांत भोंडे कमलाकर संतोष माजी जि प सदस्य अमित देशमुख वाकोद सरपंच सौ गायकवाड सुरतसिंग जोशी बाबुराव घोंगडे आदी उपस्थित होते
यावेळी संजय गरुड यांनी मनोगत व्यक्त केले वाकोद गावासाठी इतका भरीव निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ना गिरीश महाजन यांचा वारकरी फेटा घालून श्रीराम मंदिराचे तुकाराम जाधव यांच्या ग्रुप च्या वतीने गावकाऱ्यातर्फे सामूहिक नगरी सत्कार करण्यात आला . वाकोद येथून अमित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 200 महिला पंढरपूर साठी आज रवाना झाले त्यांचेसोबत स्वतः अमित देशमुख देखील गेले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास जोशी यांनी केले तर आभार संजय सपकाळ यांनी मानले