पिक विमा मंजूर
जालना लोकसभा खासदार मां.कल्याण काळे साहेबांच्या यांच्या पाठपुराव्याला अखेर यश,

सोयगाव तालुका ..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. कल्याण काळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सावळदबारासह परिसरातील शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर झाला आहे. याबद्दल सुनील माकोडे यांनी त्यांचे आभार मानले आहे. सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात व सिल्लोड परिसरात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची गंभीर बाब मा.श्री.कल्याण वैजिनाथराव काळे यांच्या समोर आली आहे. यावरुन अधिकाऱ्यांना व पिक कंपनीला खडसावत पीक विमा योजनेची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावी, अशी सूचना देऊन यावर्षीचा खरीपाचा २०२४ पिक विमा मा.श्री.कल्याण वैजिनाथराव काळे यांनी शासन दरबारी मांडून सिल्लोड सोयगाव तालुक्याचा पिक विमा मंजूर करुन घेतला 🔴

तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती सुनील माकोडे यांनी मानले.
जालना लोकसभा खासदार मा. श्री डॉ कल्याण काळे साहेबांचे यांचे आभार मानले आहेत. सोयगाव सिल्लोड तालुक्यात अवकाळी पाऊस आणिअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळं पंचनामे करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देणं गरजेचं होतं. मात्र, पीक विमा कंपनीकडून ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं, त्याची नोंदच करण्यात आली नाही. तर ज्यांची नोंद झाली त्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचं मा.श्री.कल्याण वैजिनाथराव काळे यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी यावरुन अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा पैसे येण्यास सुरुवात झाली आहे