क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गोशाळेचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा–

्रतिनिधी संतोष गर्दे
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.16- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गो शाळेचा तिसरा वर्धापनदिन दि.16 रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः विद्यापीठ श्री क्षेत्र रुद्रेश्वर संस्थान तळणी (श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान उत्तराधिकारी) महंत बालब्रम्हचारी स्वामी विद्यानंदजी महाराज, गोरक्षक मंगल महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा सचिव दिलीप शिंदे व सौ.पद्मा शिंदे यांच्याहस्ते गो माता व ध्वज स्तंभाचे पूजन करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महंत बालब्रम्हचारी स्वामी विद्यानंदजी महाराज व मान्यवरांच्या यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, कायदेविषयक सल्लागार ऍड हेमंत गुरव (लोहारा),भगवान गाडेकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गावंडे, सरपंच गजानन ढगे, कुणाल राजपूत,शिव व्याख्याते हर्षल फुसे,आप्पा वाघ,अरविंद कुलकर्णी, फरदापुर पोलीस ठाण्याचे सुग्रीव चाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हिंदू धर्मात आई नंतर गो मातेला माता मानले जाते.गोमतेच्या दुधापासून पंचगोव्य तयार करून सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. प्रत्येकाने गो माता पाळली पाहिजे असे आवाहन महंत बालब्रम्हचारी विद्यानंदजी महाराज यांनी केले ते क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गो शाळेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हर्षल फुसे,फौजदार सुग्रीव चाते,डॉ.दिनाजी खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे,उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे,सहसचिव अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर,अशोक ढगे, उर्मिला इंगळे,रुपाली लोखंडे,पद्मा शिंदे,मीना गाडेकर आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप इंगळे यांनी तर सूत्रसंचालन दत्ता गाडेकर यांनी केले व आप्पा वाघ यांनी आभार व्यक्त केले.