्रीक्षेत्र वाकोद येथून शेंदुर्णी येथे जाणाऱ्या पालखी दिंडी सोहळ्यास पळसखेडा येथील श्री रणजीत लक्ष्मण सोमनाथ यांच्याकडून फराळ वाटप.
पळासखेडा प्रतिनिधी… संतोष गर्दे सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वाकोद येथून श्री क्षेत्र शेंदुर्णी त्रिविक्रम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पायी दिंडीतील भक्तांसाठी पळसखेडा येथील दानशूर व्यक्तिमत्व श्री रणजीत लक्ष्मण सोनद यांच्याकडून दरवर्षी फराळाचे वाटप महादेव मंदिर येथे करण्यात आले.. फराळासाठी साबुदाणा केळ असे महाप्रसादाचे स्वरूप असते तसेच वाकोदेतून आलेले सर्व महाराज श्रीकृष्ण महाराज वानखेडे यांनी श्री रंजीत सोनद यांचं कौतुक केलं व आभार मानले. तसेच पळसखेडा येथील ग्रामस्थांचाही या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.