महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियाना अंतर्गत गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

प्रतिनिधी संतोष महाले ,

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आणि आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची विविध चाचण्यांसाठी ब्लड टेस्ट घेण्यात आली. विद्यार्थिनींना आरोग्याच्या अनेक अडचणी येत असतात मात्र कोणतेही टेस्ट न करता या विद्यार्थिनी सर्व आजार सहन करत असतात या संदर्भातीलच विविध चाचण्या जसे की सीबीसी हिमोग्लोबिन तपासणी आणि इतर अहवाल त्यांचे प्राप्त व्हावे यासाठी शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण टीम विद्यार्थिनींच्या रक्त चाचण्यांसाठी महाविद्यालयात उपस्थित होती. सदर कार्यक्रमासाठी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ.सचिन भायेकर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ.राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी येथील डॉक्. जोहरे आरोग्य, अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, डॉ. रोहिणी गरुड मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी , त्यांच्या समवेतच राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती जयश्री पाटील मॅडम,लॅब स्पेशलिस्ट श्री विशाल सुभाष बैरागी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनीला महाविद्यालयांत शिक्षण घेत असताना येणाऱ्या शारीरिक अडचणी सोडविण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्थाविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ योगिता चौधरी,आभार डॉ अजिनाथ जीवरग सहायक विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.