वाकोद येथे जिजाऊ जन्मोत्सव निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनप्रतिनिधी संतोष गर्देवाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी श्री.राम मंदिर, वाकोद येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयोजक : पवन देठे ,राम मंदिर गल्ली
या शिबिरामध्ये ECG, BSL, शुगर, रक्तदाब तपासणीसह हृदयरोग, मुतखडा, मूत्रपिंड, प्रोस्टेट, पित्ताशयाचे खडे, मुळव्याध, हायड्रोसिल, भगंदर, पोट व आतड्यांचे आजार, कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, मेंदू व मणका, नाक-कान-डोळे, मानसोपचार, जनरल मेडिसिन व स्त्रीरोग विभागातील तपासण्या करण्यात आल्या.
विशेष म्हणजे ASD/VSD (हृदयातील छिद्र) बिना ऑपरेशनने बंद करणे, मोफत एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, 2D इको, पेसमेकर, रीनल एन्जिओप्लास्टी, व्हॉल्व रिप्लेसमेंट व ओपन हार्ट सर्जरी संदर्भात मार्गदर्शन देण्यात आले. शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. प्रमुख उपस्थित डॉक्टरांमध्ये डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी), डॉ. आदित्य पाटील (एम.एस. सर्जन), डॉ. केतकी पाटील, डॉ. ऐश्वर्या (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. संदीप कुमावत, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. शिवानी लोखंडे, डॉ. अभिषेक लगड, डॉ. कुणाल ठोंबरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमास जगदीश भगत, प्रमिलाबाई लव्हाळे, अक्षय देठे, संजय देठे, निर्मला महाकाळ, सुनील धामोडे, संतोष देठे, आनंद पाटील, भैय्या भाऊ भगत, ओम पाटील, आकाश मोरे, दीपक वानखेडे, मयूर कुरांगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वानखेडे यांनी केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.