जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : शिवना गट व गणात इच्छुकांची जोरदार तयारी, राजकीय हालचालींना वेग


श



िवना (प्रतिनिधी – येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील शिवना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्यास पुढील काही दिवसांत तातडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून, बैठका, गाठीभेटी व जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे.
सिल्लोड तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी राजकीय पडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्याच्या घडीला युती किंवा आघाडीबाबत कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे तयारी करताना दिसत आहे. युती किंवा आघाडी न झाल्यास उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवना जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून, पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. या दोन्ही जागांसाठी अनेक इच्छुक रिंगणात उतरू इच्छित असल्याचे चित्र आहे. ‘संथाल जनसामान्य’ या वृत्तपत्राला प्राप्त माहितीनुसार खालील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
—
*अरुण पाटील काळे*
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले बाजार समितीचे मा. उपसभापती अरुण पाटील काळे हे शिवना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असून, गोरगरिबांचे काम मार्ग लावतात व कोणतेही जात पात ना पाहतात लोकांचे काम करतात व पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे . यंदा पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी संपर्क मोहिमेला सुरुवात केली असून, अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मागील काळात केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून पक्षाने संधी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. भाजपकडून संधी मिळाल्यास अरुण पाटील काळे शिवना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवतील, असे संकेत आहेत.
*मुस्तफा पठाण*
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अजित दादा गटचे व मा . ग्राम पंचायत सदस्य मुस्तफा पठान यांचा सामाजिक कार्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे तसेच नागरिकांचे अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ता नागरिकांचे चांगलेच जनसंपर्क असून त्या शिवना पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत
*रामेश्वर पाटील काळे*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते असलेले रामेश्वर पाटील काळे हे विधान परिषद आमदार व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ते समर्थक असून,
शिवना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रामेश्वर पाटील काळे यांचे सर्व जाती-धर्मातील नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. शेतकऱ्यांचे किंवा युवकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असल्याने, युवकांमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी विशेष आग्रह असल्याचे दिसून येते. पक्षाने संधी दिल्यास ते पंचायत समिती गणातून निवडणूक लढवतील, असे मानले जात आहे.
*राजू बाबा काळे*
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले राजू बाबा काळे हे शिवना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असून, सर्व जाती-धर्मातील नागरिकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. यंदा पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्याचे दिसून येते. आमदार अब्दुल सत्तार यांचे ते समर्थक असून, पक्षाने संधी दिल्यास राजू बाबा काळे शिवना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
*शेख सलीम*
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले शेख सलीम हे शिवना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते शिवना पंचायत समितीचे सदस्य असून, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांशी त्यांचा चांगला जनसंपर्क असून, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच आमदार निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे सुसंवाद आहेत. पक्षाने संधी दिल्यास शेख सलीम शिवना पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
कोणाला मिळणार संधी?
सध्या तरी कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. युती किंवा आघाडी झाली अथवा नाही, यावर उमेदवारांची संख्या आणि निवडणुकीचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्याने, इच्छुकांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून, नेमकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत शिवना गट व गणातील राजकीय हालचाली अधिकच वेग धरण्याची चिन्हे असून, सर्वसामान्य नागरिकांनाही कोणाला संधी मिळते कोणाला नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेला आहे
