प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही अंतरावर गेल्यानंतर लक्षात आले की आपण आपली पैशांची पिशवी हॉटेलवर विसरलेलो आहे तर त्यांनी हॉटेलचे मालक विवेक थाटे यांना कॉल करून विचारणा केली तर हॉटेल मालकांनी त्यांना दिलासा देत सांगितले की काही विचार करू नका तुमचे पैसे सुरक्षित माझ्याकडे जमा आहे तर ते तुम्ही कधी ही येऊन घेऊन जा. 30 जानेवारी शुक्रवार रोजी सिकंदर कलाल यांचे पिशोर व शेंदुर्णी येथील नातेवाईक आज रोजी हॉटेल नानाचा ढाबा वाकोद येथे येऊन ते पैसे त्यांना हॉटेल नानाच्या ढाब्याच्या मालकांनी त्यांचे पैसे वापस केले . या खोट्या दुनियात ईमानदारी अजून पण आहे. असे त्यांनी दाखवून दिले.
यावेळी हॉटेल नानाचा ढाबा येथील कर्मचारी पवन भावेश नवळ आचारी दगडू कोळी बाळू भाऊ
तसेच गावातील निलेश भगत संतोष मगर अंबादास गाढवे अनिल जोशी राजू कोरडे आणि साईभक्त समाधान काळे हॉटेल चे संचालक रामदास थाटे उपस्थित होते