‘मनपा’ची ही दलाली चाललीय का?
महानगराअध्यक्षांनी आयुक्ताना धरले धारेवर!
प्रतिनिधी संतोष गर्दे जिल्हा जळगाव
जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी समता नगर भागात नुकत्याच झालेल्या मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे
केवळ विरोधीच नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्या शिवसेना शिंदे गटाने ही मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला असून,शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन ,जाब विचारला आहे,शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप पाहता,आयुक्तांच्या दालनात काही वेळा साठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले आहे.