गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी अंजनाई गो शाळेस दिली


सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.27- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा ता.सोयगाव संचलित अंजनाई गोशाळेस सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी कर्मचार्यांसह दि.27 गुरुवारी सायंकाळी भेट दिली. दरम्यान गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांचा संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी गो शाळेसह पशुधनाची पाहणी केली. पशुधन सुदृढ असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी गटविकास अधिकारी यांना गो शाळे विषयी माहिती दिली.गो शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी गो शाळेच्या अध्यक्षांना दिले.गटविकास अधिकारी यांच्या समवेत पंचायत समितीचे जि.एस. गवळी,डी. एस. कटके,बी.डी. सेप,अमोल गायकवाड, चालक ज्ञानेश्वर गव्हाणे यांचे संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे,संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर आदींची उपस्थिती होती.