पाचोरा येथे कुणाल कामरा पुतळा जाळत शिंदे गटाचे तर्फे जाहिर निषेध !
जिल्हा जळगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी अविरतपणे काम करत आहेत. एका जबाबदार नेत्याविषयी कुणाल कामरा याने जाहिरपणे विनोदाच्या नावावर अश्लिष भाषेत गाण प्रसारित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. हा शिवसैनिकांचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादा ओलांडुन बेताल व्यक्तव्य केल्यास शिवसैनिक कदापी खपवून घेणार नाहीत. तसेच कुणाल कामरा यास लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करुन कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करुन आज पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुणाल कामरा यांचा पुतळा दहन करुन निषेध व्यक्त केला.यावेळी शिवसेना सेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.