*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा शाळेची नवोदय प्रवेश परीक्षेत पुन्हा यशाची परंपरा कायम*

्रतिनिधी संतोष गर्दे

पळसखेडा (27 मार्च 2025): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षेत उज्वल यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयासाठी पात्रता मिळवून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
मागच्या शैक्षणिक वर्ष 2023- 24 वर्षी चि.तन्मय मनोजकुमार बेलपत्रे व या शैक्षणिक वर्षी सन 2024- 25 मध्ये कुमारी खुशी अनिल राठोड नवोदय परीक्षा पात्रता यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून या यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक, आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. या यशा साठी शाळेचे मुख्याध्यापक ,मार्गदर्शक शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना जाते.
शाळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये सातत्याने सुधारणा करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन दिले जाते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेतले, परीक्षेच्या पद्धती समजावून दिल्या आणि त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाठिंबा दिला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक म्हणाले, “आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश मिळवून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यातही असेच यश संपादन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची ओळख आणखी मजबूत झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत.