देवाभाऊच्या कार्यकाळात गावातील महिलांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते ही मोठी शोकांतिका, घोरकुंड गावात अवैध देशी दारू विक्री प्रकरण–
सोयगाव.. प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.24- सोयगाव तालुक्यातील घोरकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतुन लपवलेल्या अवैध देशी दारूच्या बाटल्या चक्क शालेय विद्यार्थिनीने पोलिसांच्या समक्ष काढून देत तरीही बनोटी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बनोटी पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप घोरकुंड येथील महिलांनी केला आहे. आक्रमक झालेल्या घोरकुंड येथील महिलांनी चक्क मोर्चा काढीत सोयगाव पोलीस ठाणे गाठून गावात सुरू असलेली अवैध देशी दारूची विक्री बंद करण्याच्या मागणी सपोनि पंकज बारवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. देवाभाऊ च्या कार्यकाळात अवैधधंदे बंद करण्यासाठी महिलांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते ही मोठी शोकांतिका असल्याची महिलांनी सांगितले. दरम्यान गावातील अवैध देशी दारूची विक्री बिनधास्त सुरू आहे. बनोटी पोलीसांचे आर्थिक व्यवहारातून हात बरबडले असल्याने कोणतीही कारवाई केली जात नसल्याने महिलांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.
घोरकुंड गावात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात अवैध देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे शाळेच्या समोर शाळेच्या पाठीमागे व नदीच्या पात्रात या अवैध विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मोठा त्रास होत आहे तळीराम शाळेच्या भोवती धिंगाणा घालतात तसेच शेतात ये जा करणाऱ्या महिलांना नदीच्या पात्रात जातांना व येतांना त्रास होतो. नवऱ्याने उधार पिलेल्या दारूचे पैसे दारू विक्री करणाऱ्याला देण्यासाठी लाडक्या भावाने लाडक्या बहिणींना दिलेल्या पैशातून द्यावे लागत आहे. तर घरातील वस्तू दाळ दाणे विकून नवरोबा दारू पीत असल्याने अनेक महिलांनी विरोध केल्याने नवऱ्याच्या हाताचा मार खावा लागत असल्याचे काही महिलांनी सांगितले. यामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले असून काहींचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची कैफियत महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या समोर मांडली. बनोटी दुरक्षत्राचे पोलीस अधिकारी या अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलांनी केला असून दोन दिवसात गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास सोयगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी थेट मागणी महिलांनी निवेदनात केली आहे.
निवेदनावर भारती बाई साबळे, स्वाती साबळे,कविता साबळे,वर्षा पठाडे,कल्पना साबळे, कविता पठाडे,निकिता काकडे,सुमनबाई पठाडे,भारती भोई,वर्षा भोई,नवसरा मोरे,सविता साबळे, सुवर्णा भोई,ज्योती बनकर,सुनीता साबळे आदींसह गावातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान लाडक्या भावांनी पैसे न देता लाडक्या बहिणींना सुरक्षा द्यावी अशी मागणी देखील महिलांनी केली.
सपोनि पंकज बारवाल हे सोयगाव पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेले अवैधधंदे बंद करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.