जागतिक ग्राहक दिनात महसुलचा नियोजनाचा अभाव, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न–

प्रतिनिधी संतोष गर्दे

तालुकासोयगाव जिल्हा संभाजीनगर
सोयगाव दि.17- तहसिल कार्यालयात दि.17 सोमवारी जागतिक ग्राहक दिनी महसुलचा ढिसाळ नियोजनाचा अभाव दिसून आला. जागतिक ग्राहक दिनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जाणीवपूर्वक कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. दरम्यान ईकेवायसी करिता लाभार्थ्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने पत्रकार दिलीप शिंदे,संदीप इंगळे,बाळू शिंदे,शेख हक्कानी,संतोष गर्दे,ईश्वर इंगळे हे शहानिशा करण्यासाठी तहसिल कार्यालयात पोहचले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका संघटक सुधीर कुलकर्णी हे तहसिल कार्यालयात भटकंती करीत असतांना पत्रकार दिलीप शिंदे यांनी त्यांना जागतिक ग्राहक दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना निमंत्रित केले जात नाही. ग्राहकांची समस्या विचारत न घेता फक्त फोटो सेशन साठी कार्यक्रम घेतला जातो असे विचारले असता मी बघतो असे सांगितले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसिल कार्यालयात सोमवारी दुपारी एक वाजता आयोजित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दुपारी 01:45 वाजता पत्रकारांना देण्यात आल्या.जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी तहसीलदार मनीषा मेने या दुपारी 12:23 वाजता तहसिल कार्यालयात दाखल झाल्या.आठवड्याचा पहिला दिवस व जागतिक ग्राहक दिनात तक्रारी मांडण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिलांसह नागरिकांना माघारी फिरावे लागले.दरम्यान कार्यक्रमात तक्रारी जाणून न घेता जागतिक ग्राहक दिन हा तहसिल कार्यालयात फोटो सेशन साठी साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका उपाध्यक्ष संजय शहापूरकर, सचिव हितेश कुलकर्णी व तालुका संघटक सुधीर कुलकर्णी उपस्थित होते.तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर सदस्यांनी जागतिक ग्राहक दिनी दांडी मारल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या कारभाराविषयी तहसिल परिसरात उलटसुलट चर्चा रंगली होती.