• सोयगाव :- तालुक्यातील पळसखेडा या गावांमध्ये कित्येक वर्षापासून पुलाची मागणी होत आहे पळसखेडा गावाला गावाशी व बाजारपेठे सोबत जोडणारा रस्त्यावरील हा एकमेव पूल आहे तो अत्यंत जीर्ण झालेला आहे.
    पाईप पूल असल्याने यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडत आहे कित्येक वेळा ग्रामस्थांकडून स्वखर्चातून ही खड्डे बुजन्यात आली मात्र वय झाल्याने आता प पुलाची दुर्दशा काही थांबेना.
    ह्या पुलाचं काम करण्यासाठी ठेकेदार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला ते खरं ग्रामस्थांना काम होईपर्यंत पर्यायी रस्ताही काढला गेला मात्र काम सुरू करण्याच्या अर्ध्या तासां पूर्वी असं काय घडलं कि ठेकेदार आपल्या सर्व साहित्य मशनरी घेऊन निघून गेला हे अजूनही ग्रामस्थांना एक कोड झालेला आहे.
    लोकप्रतिनिधींनी या विषयावर चौकशी करून लवकरात लवकर पुलाचं काम सुरू करावा अशी विनंती ग्रामस्थांकडून केले जात आहे