आज दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा भागातील वनदेव दत्तमंदिर या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा सण महिला साजरा करतात या दिवशी महिला एकमेकींना हळदीकुंकू लावून वान देऊन शुभेच्छा देतात. असा हा कार्यक्रम आमच्या भागात निकिता अतुल बारी, अश्विनी भास्कर बारी, अनिता राजेंद्र बारी, पुनम सुदाम बारी, देवयानी सागर बारी, माधुरी जितेंद्र वारुळे, सपना अविनाश गुजर, या महिलांच्या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती केतकीताई पाटील तसेच शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ विजयाताई खलसे तसेच नगरसेविका उपस्थित होत्या. सर्वप्रथम भारत मातेच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला. तसेच महिलांनी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उखाणे व गीते सादर केली.हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमात महिलांनी एकमेकीचे औक्षण करून भेट वस्तू दिल्या. तसेच कार्यक्रमात फराळाचे वाटप करण्यात आले.हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमाला या भागातील जवळपास 500 महिलांनी उपस्थिती दर्शवली.मोठ्या आनंदाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राजेंद्र बारी आणि कार्यक्रमाचे आभार निकिता अतुल बारी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल बारी ,सागर बारी,भास्कर बारी, सुदाम बारी,अविनाश बारी,भगवान उंबरकर,गोविंदा बारी,विनोद बारी,सचिन बारी,धीरज बारी,शंकर पाटील,भिका पाटील,संदीप बारी,जितु वारुळे,बापू पाटील,गजानन बारी,यांनी प्रयत्न केले.
