शेंदुर्णी प्रतिनिधी
अप्पासाहेब. र .भा. गरुड कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कु. हर्षदा चौधरी SYBSC व जितेंद्र धनगर SYBA यांनी चाळीसगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणीत सहभाग घेतला या स्पर्धातून जिल्ह्यातील संघ तयार करण्यात आला सदर संघ अहिल्यादेवी नगर (मुले) व वार्धा (मुली)या जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे ,क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या….
