दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३– आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या गो मातेची शाश्वत गो सेवा करा, तुम्हाला गो माता शाश्वत अनुभव देईल. गो माते सारखे जगा, जगाचा पोशिंदा चुकला असल्याने निसर्ग खरे रूप दाखवित आहे. गो मातेच्या गोमतीर व शेणाचा वापर करून सेंद्रिय शेती करा गो माता भरभरून देईल. गोसेवक,बजरंग दलाचे कार्यकर्ते गो तस्करांच्या तावडीतून सोडवलेल्या गो माता या गोशाळेत आल्या तुम्हीं कितीही प्रयत्न करा गो माता दगावणारच कारण गो मातेला इंजेक्शन दिलेले असते.जगाच्या पोशिंद्याना गो माता न विकता स्वतः गोशाळेत द्या असे आवाहन श्री ह. भ. प. योगीराज महाराज कानळदेकर यांनी केले. गो मातेला चांगल्या प्रकारे संगोपन केले तर सर्व व्याधींवर गुणकारी म्हणून गो मातेकडे पाहिले जाते असे प्रतिपादन शुक्रवारी सोयगाव येथे अंजनाई गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले. दरम्यान योगीराज महाराज व मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण व गोमातेचे पूजन करण्यात आले. क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळेचा दि. १३ शुक्रवारी चतुर्थ वर्धापनदिन साजरा करण्यात आला. अंत्यविधी साठी लाकडांचा वापर न करता गो मातेच्या शेणापासून बनविलेल्या गौऱ्यांचा वापर करावा. ज्यांना गौऱ्यांची मदत लागेल त्यांनी मराठा प्रतिष्ठानशी संपर्क साधावा त्यांना प्रतिष्ठान कडून मोफत गोऱ्या पुरविल्या जाईल असे आवाहन मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज महाराज कानळदेकर तर प्रमुख पाहुणे
सहा. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. यू. टी . गुट्टे, गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार काकासाहेब सावळे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पवार,मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, आमखेडा सरपंच नंदा आगे, शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे,कुणाल राजपूत, विस्तार अधिकारी दौड, डॉ. केतन काळे,ग्रामसेवक गणेश गवळी, सत्यनारायण पुल्लेवाड, गजानन पवार, भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी गो – माते बद्दल मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी गोशाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत गोशाळेत ९० गोवंश दाखल झाले आहे.या चार वर्षाच्या कालावधीचा लेखाजोखा मांडला.यावेळी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे, अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष सौ. उर्मिला इंगळे, सदस्या सौ. रुपाली लोखंडे, सौ. मिनाबाई गाडेकर, सौ. पद्माबाई शिंदे यांच्यासह समाधान खैरनार,अरुण आहेर,दिलीप रहाटे,ज्ञानेश्वर बडक , सागर इंगळे, भगवान दणके, पवन आगे,रमेश शिंदे, गोशाळा कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव,अनिल ठाकरे,राहुल सोनवणे,शिवाजी फरकाडे,विष्णू तिडके,केतन शिंदे, अथर्व इंगळे,मयुर शिंदे,प्रशांत घनगाव, अनिल निकुंभ यांच्यासह परिसरातील गो प्रेमींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी मानले.