पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार
🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा
🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती
🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार
बातमी :
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती उत्तम चव्हाण तसेच पंचायत समिती सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पळसखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते सभापती व सदस्यांचे गावाच्या वतीने स्वागत करून सत्कार केला.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना घरकुल योजना व गाय-गोठा योजनेच्या थकीत अनुदानाबाबत माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांचे थकीत पैसे लवकरच टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील, त्यासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सभापती उत्तम चव्हाण व सदस्य राजू राठोड यांनी दिले.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
