फर्दापूर येथे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण होताच येथे अत्याधुनिक आरोग्याच्या दृष्टीने हायटेक सुविधा व त्याप्रमाणात आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील असे सांगत फर्दापूर व परिसरात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे देखील आ. अब्दुल सत्तार म्हणाले. आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने फर्दापूर येथे मंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान - 6 कोटी 25 लाख, फर्दापूर येथील विश्रामगृह बांधकाम करणे - 3 कोटी, अजिंठा लेणी - फर्दापुर गावअंतर्गत ते हेलीपॅड रोड सिमेंट काँक्रेटीकरण रस्ता करणे - 1कोटी, रा.मा. २४ ते फर्दापुर गावअंतर्गत सिमेंट काँक्रेटीकरण रस्ता करणे 1 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 753 ते फर्दापुर (सराई) सिमेंट काँक्रेटीकरण रस्ता करणे - 1 कोटी असे एकूण 12 कोटी 25 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व 75 लाख रुपये किंमतीच्या बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आ. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला. भूमिपूजन सोहळा निमित्त येथील चौक परिसरात आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना आ. अब्दुल सत्तार बोलत होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, उपसभापती दारासिंग चव्हाण , माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, सयाजीराव वाघ ,माजी सभापती धरमसिंग चव्हाण , खालेक पटेल , न.प.तील शिवसेना गटनेता अक्षय काळे, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे,युवा सेनेचे कुणाल राजपूत , उस्मान खा पठाण, विलास वराडे, बंडू काळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलत असतांना आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, फर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवसांपासून मंजूर होते. मात्र जागेच्या अडचणीमुळे याचे काम सुरू झाले नाही. जागेचा तिढा आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सोडविला त्यामुळे आज बहुप्रतिक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांच्या सेवेत ही सुसज्ज ईमारत उभी असेल यामुळे परिसरातील गावांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले. मतदारसंघात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे आ. अब्दुल सत्तार म्हणाले. विकास कामांचे उद्घाटन झाले ती कामे तातडीने सुरू करण्यात यावी यासह काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
याप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना आ. अब्दुल सत्तार यांनी फर्दापुर व परिसरात केलेल्या विकास कामाबाबत माहिती दिली. फर्दापूर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी टप्पा दोन चा निधी मिळतात टप्पा दोनच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार म्हणाले. रावळा – जावळाच्या वनविभाग अंतर्गत रस्त्याचा तिढा लवकरच सुटेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. फर्दापूर ते चाळीसगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून वर्षभरात हा रस्ता पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले . फर्दापूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी रस्त्यासाठी प्रस्ताव सादर करावा यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
कार्यक्रमास पंपिंद्रसिंगपाल वाय टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय टाकसाळे, शाखा अभियंता नितीन राठोड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावर ,शाखा अभियंता दीपक मोगडे ,राजेश राजगुरु, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेश छाबडा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा डुकरे यांच्यासह सुरेखाताई तायडे ,अशोक देशमुख ,गणेश वाघ, गजानन चाथे, फिरोज पठाण, रवींद्र बावस्कर, विजू तायडे ,कॅप्टन मकसूद कादरी ,भीमा बोराडे, शेख मुख्तार, शेख जाकीर ,उस्मान खा पठाण, नामदेव सोन्ने, सलीम खा पठाण, पांडुरंग थोरात , रंगनाथ वराडे, अझहर शेख ,इमरान शहा, हर्षल काळे, राधेश्याम जाधव ,भारत तायडे,अनिस खा पठाण, गजानन कुडके, छोटूसिंग राजपूत आदिंसह फर्दापूर व परिसरातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
