सोयगाव तालुक्या मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून या अगोदर ही बऱ्याच आत्महत्त्या झालेल्या आहे अशीच घटना सोयगाव तालुक्या
मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान चारू मूर्ती येथील शेतकरी ईश्वर मुलचंद जाधव या शेतकऱ्याने शेतात अनाड शिवारामध्ये कर्जाला कंटाळून लिंबाच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी यांनी त्वरित घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून सदरील मृतदेह सावळदबारा आयुष्यमान भारत वर्धिनी आरोग्य केंद्र येथे हलवीत शवविच्छेदन करण्यात आले
या घटणे संदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुग्रुव चाटे, बिट जमादार मिरखा तडवी, पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ हे करीत आहे
