सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सोयगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळेद्वार सावळदबारा येथील श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी पाणंद रस्ता अपूर्ण असुन त्या अपूर्ण पाणंद रस्त्याचे संपूर्ण बिल काढण्यात आल्या ची तक्रार 24 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक जीवन कोलते सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले सावळदबारा येथील मा. गांधी रो.ह. योजनेअंतर्गत जाईचा देव पांदण रस्ता अतिशय बोगस व दगडात मुरूम टाकून अतिशय निकृष्ट क्वालिटीचा मोठें मोठं दगडात व माती मिश्रित मुरूम टाकून दोन्ही बाजूला नाले न खोदता अपूर्ण कामे करत सर्व बील काढण्यात आले आहे मागील वर्षी 2023 24 मध्ये एमआरजीएस अंतर्गत श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी पाणंद रस्ता मंजुरी झाला होता या रस्त्यासाठी शासनाने लाखो रुपयाचा निधी दिला होता ज्यावेळेस रस्ता सुरू होता त्यावेळेस सुद्धा अनेक गावकऱ्यांनी तहसीलदार सोयगाव व गट विकास अधिकारी सोयगाव यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन सुद्धा काहीच कारवाई झालेली नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांनी या कामाचे संपूर्ण चौकशी करून हा झालेला लाखो रुपयाचा निधी कुठे व कोणी गडप केला याबद्दल आपल्या स्तरावर चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जिवन कोलते सर व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे