शेंदुर्णी गावाला सतत दूषित पिण्याच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा प्रशासनावर संताप!…
शेंदुर्णी गाव २०११च्या जनगणने नुसार सुमारे २२५५३ , लोकसंख्या असलेल्या गावात सुमारे ३४००/३५०० नळांना पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाणीपुरवठा होतो. गावातील ५, लाख लिटर्स क्षमतेच्या दोन जलकुंभातून नगरपंचायत शेंदुर्णी यांच्या मार्फत ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. गावात जवळपास ३४००/३५०० नळ कनेक्शनधारक असून, गेल्या काही दिवसांपासून गावात दूषित दुर्गंधीयुक्त पिवळे रंगाच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याची ओरड अन् तक्रारी नागरिकांमार्फत होत आहे . शेंदुर्णी येथे सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातच टाकी दुरुस्त साफसफाईच्या कामानिमित्त गावाला पंधरा दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे त्यात देखील सातत्याने होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावाच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रमुख विभागाला माहिती देऊन देखील कुठलीच कारवाई त्यांच्यामार्फत करण्यात आलेली नाही
स्थानिक नगरपंचायत प्रशासन मुख्याधिकारी विवेक धांडे शेंदुर्णी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहे. गावाला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली नुसतीच तोंडाला पाणी पुसले जात आहे. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मदतीने नगरपंचायतीस कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन विकास कामे करण्याच्या सूचना केल्या असता त्याचा कुठलाच उपयोग झालेला गावात सध्या तरी दिसत नाही. पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली हजारो रुपयांची बिले काढली जातात, असा आरोप यावेळी गावातील तुज्ञ नागरिकांमार्फत केला जात आहे शेंदुर्णी नगर पंचायत मार्फत गावात ८५० रुपये पाणीपट्टी देऊन सुद्धा इतर कर लावल अव्वाच्या सव्वा वसुली करून. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी झाल्याचे पाहून नागरिकांनी
संताप व्यक्त केला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
