सोयगाव प्रतिनिधी..

          आज दिनांक 9/2/ 2025 रोजी जि प केंद्र शाळा वाकोद तालुका जामनेर येथे बाल आनंद मेळावा अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवहार ज्ञान व्हावे फायदा नुकसान नफा तोटा या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकता याव्यात पैसे हाताळता यावेत .हा उद्देश या उपक्रमामागे होता… खवय्यांसाठी वेगवेगळ्या व चविष्ट असे एकूण 40 पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांसाठी लावलेले होते. त्यात बादलीत नाणे टाकणे. वस्तूवर रिंग टाकणे, एका माचिस काडीत बारा मेणबत्ती पेटवणे अशा प्रकारचे पैसे दुप्पट करण्यासाठी चे गमतीदार खेळ ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी 50 रुपयांपासून 250 रुपयापर्यंत पदार्थांची विक्री केली. अतिशय आनंदात व उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची आनंद घेतला व पालकांच्या आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. तसेच वाकोद केंद्राचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व प्रभारी केंद्रप्रमुख श्री. विजय गायकवाड सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दिपक गायकवाड व शिक्षणप्रेमी श्री .विनोद राऊत व गावातील ग्रामस्थ व सर्व सदस्य उपस्थित होते.🌹🌹🌹🙏🙏