सोयगाव तालुका..
प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळेव्दार येथील श्री चक्रधर स्वामी यात्रेला मंगळवार पासून उत्साहात सुरुवात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पवित्रपदस्पर्शाने पावन झालेल्या सावळदबारा नगरीत दांडी पौर्णिमा निमित्त श्री चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीय पाच दिवसीय यात्रा महोत्सव सुरू झाली आहे पाच दिवसीय यात्रेमध्ये श्री चक्रधर स्वामी देवस्थान समिती व गावातील जय बजरंग मित्र मंडळ यांच्या वतीने यात्रेला ला येणाऱ्या भाविकांसाठी दर वर्षी चहा नाश्ता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते रात्रभर भाविक येतात येणाऱ्या भाविकांसाठी परिसरातील व महाराष्ट्रातील विविध भक्तांकडून भंडारे नवस व महाप्रसादाचे वितरण करण्यात येते यात्रेत काही
अनुचित प्रकार घडू नये यासाठी फर्दापूर पोलिस निरीक्षक प्रफुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मिरखा तडवी पोलीस कॉन्स्टेबल शिवदास गोपाल व फर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त करण्यात येतो