उत्कृष्ट पाच शैक्षणिक साहित्यांमध्ये निवड व गौरव
शेंदुर्णी (वार्ताहर)- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) शिक्षण विभाग, जि.प.अमरावती आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञान नगरी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर मोर्शी रोड अमरावती (महाराष्ट्र )येथे घेण्यात आले.
त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रमोद आत्माराम सरोदे त्यांनी सादर केलेल्या ‘टाकाऊ पासून टिकाऊ शिक्षण’ (Best Education From Waste )या शैक्षणिक साहित्यांला राज्यात उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .
राज्यामधील सर्व जिल्ह्यांतील राजस्तरावर निवड झालेल्या शिक्षकांनी शैक्षणिक उपकरणे सादर केली. त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात उत्कृष्ट पाच शैक्षणिक साहित्यांमध्ये त्यांच्या उपकरणाचा समावेश करण्यात आला . यावेळी राज्यभरातून निवड झालेल्या 111 शिक्षक व 330 विद्यार्थी सहभागी होते .
भारत देशात दरवर्षी 38 लाख टन प्लॉस्टीक कचरा तयार होतो त्यांची विल्हेवाट लावणे मोठे आव्हान आहे. अविघटनशील असल्यामूळे पर्यावरणात प्रदुषण निर्माण होते . मात्र याच प्लास्टिक टाकाऊ पदार्थाचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक साधने त्यांनी निर्माण केले .
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विज्ञान विषय अभ्यासक्रमातील विविध घटक, संकल्पना, प्रतिकृती, कार्यप्रणाली आधारीत शैक्षणिक साहित्य त्यांनी सादर केले .अतिशय दूर्गम भाग, ग्रामिण भाग अथवा शहरी भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करण्यास या शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर करता येतो. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त,वास्तववादी शिक्षण देवून त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यास मदत होते .
महाराष्ट्र राज्य शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग श्रीमती नीलिमा टाक, शिवाजी महाविद्यालय अमरावती संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर संचालिका हर्षलता बुराडे,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर चे अधिव्याख्याता प्राध्यापक प्रविण राठोड यांच्या उपास्थित त्यांना पारितोषिक देण्यात आले.
जि.प जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण,Inspired Award चे राज्य समन्वयक भरतकुमार लाड, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक योगिता झांबरे,पंचायत समिती जामनेर गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी अभिनंदन केले .
डॉ.हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्षा डॉ.कौमुदी साने, संचालक डॉ.कल्पक साने, सचिव कांतिलाल ललवाणी, सरस्वती विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका मिरा इंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
