शेंदुर्णी ता जामनेर

धी.शेंदुर्णी एज्युकेशन को ऑप सोसायटी संचलित,
आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी,
येथील विद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासो संजयरावजी गरुड,संस्थेचे सचिव सागरमलजी जैन,संस्थेचे सहसचिव, दादासो यु.यु.पाटील,ताईसो.सरोजिनी गरुड, भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,शांताराम बापू गुजर,सुधाकर अण्णा बारी,प्रदीप सपकाळ,प्रसन्न फासे,महेश भदाणे डॉ.अजय सुर्वे,अमृत भवरे,शकूर शेख दिग्विजय सूर्यवंशी,भगवान अहिरराव, विठ्ठल गरुड,विलास अहिरे,दीपक जाधव, विजय चौधरी,दीपक गरुड,गोविंद गोपाळराव सूर्यवंशी एस.बी.निकम,नंदकिशोर बारी, नितीन शिवपूजे,राजेंद्र पवार, दीपक जाधव,काशिनाथ बारी,देवेंद्र पारळकर,राहूल धनगर,जोशी सर, प्रभाकर सपकाळ,आस्वार सर, डी. आर.जोशी,विद्यालयाचे मुख्याध्यापक /प्राचार्य ,आर एस चौधरी पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे,विनोद पाटील गावातील ग्रामस्थ विविध पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन ताईसो सरोजिनी गरुड यांनी केले, ध्वजपूजन एडॅ.प्रसन्न फासे यांनी केले तर ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन दादासो संजयरावजी गरुड यांनी केले. या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर, स्काऊट ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी संचलन,स्काऊट गाईड संचलन भारतीयंम तसेच विविध कवायत करण्यात आलेत.तद्नंतर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यात राज्यातून प्रज्ञाशोध परीक्षेत, भूगोल विषयात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी डिंपल कोळी, या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सन्मान सोबतच राज्यातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण,रागिनी तसेच, शासकीय रेखा कला चित्रकला स्पर्धेत राज्यातून सातव्या क्रमांकाने आलेला विद्यार्थी मोहित संजय चव्हाण याचा देखील, सत्कार करण्यात आला याप्रसंगी संविधान वाचन व काॅपी मुक्त शपथ.पी,जी.पाटील यांनी केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.वारांगणे यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.