मुख्य अधिकारी यांचे नगर पंचायत कार्यालया कडे दुर्लक्ष.?
राहुल सपकाळे:
जामनेर प्रतिनिधी:
शेंदुर्णी नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्यात क्रमांक दुसरा असा मानाचा पुरस्कार तीन झालेला असला तरी शेंदुर्णी नगरपंचायत कार्यालयात मात्र स्वच्छतेचे वाजलेत तीन तेरा आपल्याच द्वारावर स्वच्छता करण्यासाठी नगर पंचायतीला वेळ मिळत नाही का.? नगर पंचायत कार्यालयाच्या भिंतीवरच खूप मोठ्या प्रमाणात घुटका पान खावून थुकाल्याचे नगर पंचायतीच्या भिंतीकडे बघून समजते मात्र शेंदुर्णी नगरी स्वच्छ करायला निघालेल्या मुख्य अधिकारी साहेबांना आपल्याच कार्यालयाच्या भिंतीची झालेली दूर अवस्था ही 26 जानेवारी च्या दोन तीन दिवस अगोदर आठवल्याने सबंधित भिंतीना आता कलर करण्याचे काम होताना बघायला मिळत आहे. कदाचित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस या महिन्यात नसता तर नगर पंचायतीच्या भिंतीचे भाग्य या महिन्यात बदलले नसते अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु असल्याचे समोर येत आहे.मुख्य अधिकारी साहेबांनी आपल्या जबाबदारी सोबतच कार्यालयावर देखील लक्ष द्यावे या चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आले आहे.
