सफाई कामगार तसेंच नागरिकांचा घेतला चावा शाळकरी मूल मात्र झालेत भयभीत
जामनेर प्रतिनिधी:
जामनेर तालुक्यातील झपाट्याने विकासाच्या पायवाटेवर असलेल्या
शेंदुर्णी येथे दिनांक: २५/१/२०२५ शनिवार रोजी सकाळी ६:०० वा. च्या सुमारास १) कल्पना सुरेश निकम (वय-४०) झाडू कामगार सफाई काम करण्यासाठी जात असताना त्या महिलेचा चावा मोकाट कुत्रांनी घेतला. तसेच सकाळी फिरायला (जॉगिंग) जात असलेले सुनिता भास्कर बारी (वय-४५ ) या दोघांचा तसेंच विध्यार्थी दिव्याने गुजर (वय-१६) या तिघांचा पिसाळलेल्या कुत्र्याने मोठ्या प्रमाणात चावा घेतला असून कुत्रा चावल्यास देण्यात येणारे अँटी रेबीज इंजेक्शन देऊन खोल जखमा मध्ये देण्यात येणारे इम्मुनोग्लोबुलिन इंजेक्शन देण्यास व त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले. तसेच सुभाष मुळे (वय-७४), नवीन सूर्यवंशी (वय-४८), अजय गुजर (वय-१८)विद्यार्थी, नारायण हरी घोडेस्वार (वय-४६), मंगला अरुण धनगर (वय-२९), अलका चंद्रकांत भोई (वय-५५) यांचाही पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून शेंदुर्णी ग्रामीण रुग्णालयात यांच्यावर उपचार करण्यात आला.
शेंदुर्णी गावात बाहेर गावावरून सोडण्यात आलेले कुत्र्यांचा या मध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तसेंच गावातील पिसाळलेले कुत्रे रस्त्यावर व मुख्य बाजारपेठ, नागरी कॉलनी, गल्लीमध्ये फिरत असल्याने नागरिक खूप त्रस्त झाले असून शाळकरी मुलांना शाळेत एकटे पाठवण्यासाठी त्यांना विचार करावा लागत आहे. मात्र शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी या विषयावर वृत्त पत्रात बातम्या प्रसारित होवून सुद्धा गेल्या काही महिन्यापासून नुसते आश्वासन देवून नागरिकांची दिशाभूल करताना वेळ मारण्याच काम या ठिकाणी करत असल्याचे बघायला मिळत आहे.या सर्व प्रकारामुळे एखाद्याचा जीव जाईल तेव्हा काही उपाय योजना मुख्य अधिकारी साहेब करतील का.? या विषयाची चर्चा नागरिकांमध्ये होताना बघायला मिळत आहे. एकाच वेळी गल्लीत दहा-बारा कुत्री झुंडीच्या झुंडीने फिरत असून विद्यार्थ्यांचा, झाडू कामगारांचा, फिरणाऱ्या तरुण व व वृद्ध लोकांचा चावा घेताना दिसत आहे.या सर्व प्रकारमुळे एकूण नऊ जण जखमी झालेले असून लहान मुलांना सोबत ठेवणे यासाठी नागरिकांना आपला जीव मुठीत ठेवून फिरावे लागत आहे. मात्र शेंदुर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. वारंवार वृत्त पत्रात बातम्या प्रसारित होवून सुद्धा शेंदुर्णी नगरपंचायतीने यावर नुसत्या बैठका बोलावल्या त्या बैठकीमध्ये मुख्याधिकारी साहेब, गावातील नागरिक, फारुख खाटीक माजी नगरसेवक व पत्रकार बंधू उपस्थित होते.या बैठकीत मुख्याधिकारी यांनी सांगितले होते की मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले.मात्र प्रत्यक्षात यावर कुठलेही उपाय योजना केली नाही वेळेत या सर्व गोष्टींवर आळा बसला असता तर नवू लोकांना मोकाट कुत्रांनी कदाचित चावा घेतला नसता.मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी हे आधी पर्यंत करतील या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
