प्रतिनिधी संतोष गर्दे

राणी दानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद तालुका जामनेर या विद्यालयात दिनांक24/01/2025 वार शुक्रवार रोजी इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा संपन्न करण्यात आला . या मेळाव्यामुळे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विनोद सिंह जी राजपूत साहेब ( जैन फॉर्म व्यवस्थापक वाकोद) यांच्या हस्ते करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडून शाळेतील विद्यार्थ्यांना पैशाच्या देवाण-घेवाण क्रिये मधून व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत करण्यात आली.या खाद्य मेजवानी मधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाची चव चाखण्यास मिळाली या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. टी. चिंचोले सर, पर्यवेक्षक एन टी पाटील सर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.