सोयगाव जिल्हा छ.संभाजीनगर

तरिही वरिष्ठ अधिकारी झोपा घेतात का ? असा प्रश्न निर्माण होत आहे

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती, सिमेंट रोड, बंदिस्त गटार, पाण्याचे हाऊद, पाईप लाईन, शौचालय.व इतर अनेक कामांन मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून सरपंच व ठेकेदार यांनी मिली भगत करून कामां मध्ये केलेल्या भ्रष्टाच्याराचे पुरावे नस्ट करण्यासाठी ग्रामपंचायत मधील शासकीय कागदपत्रे दास्तायेवज केले लंपास या प्रकरणी सोयगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या कडे दिनांक २४ / १२ / २०२४ रोजी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी या भ्रष्टाच्याराची चौकशी करण्या संदर्भात तक्रार दाखल केली होती आणि चौकशी न झाल्यास दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सोयगाव पंचायत समिती कार्यालया समोर ढोल बाजाओ आंदोलन करण्याचा तक्रार पत्रा द्वारे इशारा देण्यात आला होता मात्र गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी सोयगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. एन. दौड यांना या प्रकरणी लेखी स्वरूपाचे पत्र काढून तात्काळ चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे तसेच गटविकास अधिकारी यांनी असे ही आश्वासन दिले कि लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात येईल तरी आपण हे आंदोलन थांबविण्यात यावे असे सांगितले त्यामुळे २६ जानेवारी २०२५ रोजी सोयगाव पंचायत समिती कार्यालया च्या समोर होणारे ढोल बजाओ आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आले. जर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास लवकरच आंदोलना संदर्भात पुढील तारीख निश्चित करण्यात येईल ग्रामपंचायत मधील शासकीय दस्तायेवज ची चोरी करणारे नेमके चोर कोण याचा उलगडा शोध या चौकशी दरम्याम समोर येऊ शकतो त्यामुळे या भ्रष्टाच्यारी यांचे धाबे दनाणलेले आहे या चौकशी मुळे त्यांचे सर्वच काळे कारनामे जनते समोर येऊ शकतात त्या साठी कोणत्याही परिस्थिती मध्ये ही चौकशी दाबण्याचा प्रयत्न राजकीय नेते पुढारी यांचा दबाव तंत्र निर्माण करून ही चौकशी आणि भ्रष्टाचार दाबण्याची पूर्ण तय्यारी रण निती या भ्रष्टाचारी सरपंच,व ठेकेदार यांच्या कडून सुरु आहे त्याच मुळे ही चौकशी पुढे पुढे ढकलण्यात येत आहे तसेच चिरी मिरी देऊन हा घोटाळा दाबण्याचा पूर्ण प्रयत्न ही हे घोटाळे बाज करण्याच्या तय्यारीत आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी कोणत्याही अमिषाला बळी न पडता तसेच कोणत्याही नेत्यांच्या पुढऱ्यांच्या दबाव तंत्राला न दबता न घाबरता या प्रकरणी पूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी मागणी केली आहे