अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे..

Shendurni ता. जामनेर

शेंदुर्णी ते मराठवाड्यातील सोयगाव या गावांना जोडणारा राज्य मार्गाची चाळण झाल्याने चार ते पाच जालना अद्याप पर्यंत जीव गमवा लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज दिनांक 22 रोजी शेंदुर्णी येथील स्टेट बँक जवळील सोयगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज आंदोलन होऊन संबंधित विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी एका महिन्याच्या आत संपूर्ण रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच कामाची निविदा प्रक्रिया चालू असल्याचे पत्र देखील दाखविले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन नागरिकांनी मागे घेत एक महिन्याचा अल्टिमेटम दिला.

येथील शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यालगत शेंदुर्णी परिसरातील अनेक नागरिकांच्या शेती आहेत. तसेच दररोज दळणवळण करावे लागते. रस्त्याचे अक्षरशः चाळण झालेले आहे. रस्ता अरुंद आणि त्यातही खड्डे असल्याने रस्त्यावरून वाहन चालवताना खड्डा चुकवताना अनेक वेळा वाहन रस्त्याच्या खाली उतरून नालीमध्ये अथवा रस्त्या लगत असलेल्या दगडांवरती आदळून नागरिकांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत. तसेच दररोज शेतीसाठी ये जा करावी लागत असते. परंतु रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे शेतातील पिकलेला माल व्यापार पेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनधारकांची तोल तोल करावी लागत आहे.

खड्ड्यांमुळे शरीराला दणके बसून मणक्यांचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वारंवार मागणी करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने अखेर नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. त्यामुळे आज शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावरील स्टेट बँकेजवळ वाहने आडवी लावून रस्त्यावर ठिया मांडण्यात आला. जोपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली.

आंदोलकांची ठाम भूमिका बघता बांधकाम विभागाचे उप अभियंता आंदोलन स्थळी दाखल झाले.

आंदोलकांनी त्यांच्यासमोर आपबीती मांडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत उपभियंता यांनी मागणी मान्य करीत असून त्वरित वर्क ऑर्डर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा पत्रव्यवहार दाखविला त्यामुळे आंदोलकांनी एक महिन्याचा अल्टीमीटर देऊन आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

गावातील सुज्ञ नागरिकांकडून या आंदोलनाबद्दल आंदोलकांचे आभार मानत आहेत.

पत्रकारांनी आंदोलनात घेतलात अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

शेंदुर्णी येथील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलकांच्या मागण्या समजून घेत अधिकारी आल्यानंतर त्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कामात आज पर्यंत शेंदुर्णीतील पत्रकारांनी लक्ष घातले नसून सदर काम पूर्ण न केल्यास प्रत्येक कामात बेकायदेशीर बाबींवर लक्ष घालून बातम्यांच्या माध्यमातून उजेडात आणल्या जातील असा इशारा देत धारेवर धरले.

वाहनांच्या लागल्या लांब रांगा

सकाळची वेळ असल्याने शाळा महाविद्यालय तसेच व्यापार पेठे साठी ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली. त्यामुळे बस प्रवाशांना याचा फटका बसला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंदोलनचा पत्रव्यवहार होऊन निर्णय न लागल्याने आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची संपूर्ण कर्यालईन प्रक्रिया आंदोलकांनी पूर्ण केलेली होती. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप आणि शेंदुर्णी आऊट पोस्ट चे उपनिरीक्षक श्री.शिंब्रे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.