जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

शेंदुर्णी (वार्ताहर)- शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सेंट टेरेसा हायस्कूल जळगाव येथे घेण्यात आले . त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात शेंदुर्ण येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रमोद आत्माराम सरोदे यांनी जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला . त्यांनी सादर केलेल्या ‘टाकाऊ पासून टिकाऊ शिक्षण’ या शैक्षणिक साहित्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली .

इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विज्ञान विषय अभ्यासक्रमातील विविध घटक, संकल्पना, प्रतिकृती, कार्यप्रणाली आधारीत शैक्षणिक साहित्य त्यांनी सादर केले . अतिशय दूर्गम भाग, ग्रामिण भाग अथवा शहरी भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करण्यास या शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर करता येतो. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त,वास्तववादी शिक्षण देवून त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यास मदत होते .

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, एजाज शेख, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते .

पंचायत समिती जामनेर गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी अभिनंदन केले .

डॉ.हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्षा डॉ.कौमुदी साने, संचालक डॉ.कल्पक साने, सरस्वती विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका मिरा इंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .