
A

ch..छत्रपती संभाजीनगर — जळगाव महामार्गावर फर्दापूर येथे टी. पॉइंट सोयगाव
प्रतिनिधि संतोष गर्दे
फाट्यासमोर क्रूझरगाडी.आणी मोटार सायकल चा अमोर समोर भीषण अपघात. या अपघाता मध्ये सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सबदर मन्सूर तडवी या 52 वर्षीय व्यक्ती चा भीषण अपघातामध्ये झाला मृत्यू.
Voice…छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे हॉटेल टी.पॉईंट समोर दिनांक तीन फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सबदर तडवी हे फर्दापूर येथून त्यांच्या पळसखेडा गावाकडे मोटार सायकल वरती जात असताना सोयगाव फाट्या समोर त्यांच्या मोटार सायकल आणी क्रूझर जीप गाडी चा अमोर समोर भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये सबदर तडवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यावेळेस क्रुझर गाडीचे चालक राजू नामदेव सावळे राहणार डाबियाखेडा तालुका नेपानगर. जिल्हा बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांनी अपघात ग्रस्त जखमी अवस्थेत असलेले सबदर तडवी यांना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. तेथील डॉक्टरांनी तपासून या व्यक्तीला मृत घोषित केले. या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद फर्दापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचारी निलेश लोखंडे, व फिरोज तडवी यांनी घटनास्थळी या घटनेचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश लोखंडे हे करीत आहे
