*तोंडापूर येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने भव्य रक्तदान;१३१ रक्त कुपिकांचे संकलन*

प्रतिनिधी दीपक गायकवाड

तोंडापूर. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नानिजधाम यांच्या प्रेरणेने तोंडापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. ११ जानेवारी रोजी तोंडापूर येथे राजे मल्हारराव होळकर सभागृहात हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या जीवनदान महा कुंभामध्ये तब्बल 131 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाची सेवा केली.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डि के पाटील(मा. जिल्हा बँक संचालक), यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जे के चव्हाण साहेब (मा. अभियंता जिल्हा परिषद जळगाव), रंगनाथ काळे, सुखदेव पाल्हाळ, जितेंद्र पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ.डी यू पाटील, विठ्ठल दांगोडे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन जिल्हा निरीक्षक जळगाव गणेशजी राकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामानंद संप्रदाय विठ्ठल दांगोडे, तालुका महिला अध्यक्ष मीना बनकर, जिल्हा ब्लड कॅम्प प्रमुख सचिन गवरे, विलास दांडगे, रामधन गोरे, एकनाथ कोळी, विशाल दांडगे, संदीप इंगळे, जितेंद्र चव्हाण, गणेश कोळी, तोंडापूर, गोराडखेडे, कुंभारी, वडगाव सद्दो, ढालशिंगी, भारुडखेडे येथील भक्तगणांनी अथक परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरास तोंडापूर सह परिसरातील रक्तदात्याकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात 4 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत विविध ठिकाणी शिबिरे होत आहेत संकलित करण्यात आलेले रक्त शासकीय रक्तपेढींना देण्यात येते यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे शिबिरामध्ये नागरिकांनी तरुणांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला त्याबद्दल रामानंद संप्रदायाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.