माळेगाव पिंपरीत रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ..
..
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..
..
सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माळेगाव पिंपरी येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात झाली आहे. हे शिबिर ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकी, शिस्त व सेवाभावाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिरीष पवार होते.
यावेळी प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांनी जलसंधारण, पडीक जमीन विकास व ग्रामीण विकासाच्या उपक्रमांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या माध्यमातून स्वच्छता, जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविका, महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
