जळगाव महापालिका निवडणूक : वार्ड क्रमांक ४ मध्ये उभाठा गटाची जोरदार प्रचार रॅली

जळगाव | प्रतिनिधी विनोद पवार
जळगाव महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ४ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची (उभाठा) भव्य प्रचार रॅली आणि सभा उत्साहात पार पडली. या रॅलीत उभाठा गटाचे उमेदवार प्रवीण विष्णू माळी, ज्योती शरद तायडे, पूजा निलेश देशमुख आणि पियुष संजय कुमार गांधी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली.
या प्रचार सभेला पक्षाचे प्रमुख नेते तसेच बाल सदानंद मोरे सर, ज्ञानराज मोरे, आयुष मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि पारदर्शक कामकाज करू,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.
रॅलीदरम्यान घोषणाबाजी, झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. उभाठा गटाच्या या शक्तिप्रदर्शनामुळे वार्ड क्रमांक ४ मधील निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.