जळगाव | प्रतिनिधी : संतोष गर्दे
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेचारच्या सुमारास जळगाव शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रथयात्रेला शहरातील विविध चौका–चौकांत नागरिकांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत केले.
या महाविजय रथयात्रेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोड शोदरम्यान महायुतीचे सर्व ७५ उमेदवार रथयात्रेत सहभागी झाले असून, जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे व समर्थकांच्या जल्लोषामुळे परिसर दणाणून गेला होता. ही रथयात्रा शिवाजी पुतळ्यापासून नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे पुन्हा शिवाजी पुतळा येथे उत्साहात समारोप करण्यात आला. रथयात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
