तीर्थ रेसिडेन्सी, चौधरी नगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..जालना ३ जानेवारी रोजी तीर्थ रेसिडेन्सी, चौधरी नगर, जालना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री. दिनकर भुतेकर (भारत गरर्ड) यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक प्रकाश वाघमोडे सर, श्री. खांडेभराड सर, श्री. विष्णू भोसले सर, श्री. समाधान मांडे सर, श्री. किशोर शिंदे सर, श्री. बहुरे सर, श्री. शरद डोईफोडे, श्री. मदन मोहिते, श्री. विलास घुले सर, श्री. संतोष बिराजदार सर, श्री. भागवत भोसले, श्री. भुबर मामा, श्री. सोपान जाधव मामा, श्री. राजू पवार, श्री. राजेश पवार, श्री. श्याम भुतेकर, श्री. सुभाष घुले, श्री. सुंदर कदम, हर्षद भोसले, व्यंकटेश गरर्डे, श्री. शेवाळे यांच्यासह कॉलनीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रकाश वाघमोडे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम शांततामय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.