*जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थानच्या वतीने जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन.*
प्रतिनिधी दीपक गायकवाड

दिग्रस – जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने जगद्गुरुश्रींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. रामानंद संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र सह, गुजरात,मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश,तेलंगणा, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात 4 जानेवारी जिल्हा रुग्णालय व भोजे तालुका पाचोरा,7जानेवारी रावेर व भुसावळ, 8जानेवारी कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव,10 जानेवारी सिद्धेश्वर हनुमान मंदिर शिरसाळा तालुका बोदवड, 11 जानेवारी भैरवनाथ मंदिर सावखेडा तालुका पाचोरा व ग्रामीण रुग्णालय धरणगाव, तोंडापूर तालुका जामनेर, चाळीसगाव, 12 जानेवारी ग्रामीण रुग्णालय चोपडा,या ठिकाणी, 6 जानेवारी पद्मालय तालुका एरंडोल व मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे सकाळी 9 : 00 ते सायंकाळी 6 : 00 या दरम्यान गणपती मंदिर, पद्मालय तालुका एरंडोल 9 जानेवारी पारोळा जिल्हा जळगाव येथे जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उत्तर महाराष्ट्र पीठ प्रमुख संजय गाडेकर साहेब, पीठ व्यवस्थापक प्रवीण ठाकूर साहेब, जिल्हा निरीक्षक गणेश राकडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल दांगोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवाजी शेकडे, जिल्हा ब्लड कॅम्प प्रमुख सचिन गवरे, एरंडोल तालुकाध्यक्ष मनोज शिंपी यांनी दिली.
संस्थान तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा, ग्राम स्वच्छता अभियान, वेदपाठ शाळा, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका महाराष्ट्रातील विविध मार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अपघातग्रस्तांच्या सेवेत आहेत, मोफत शिलाई मशीन वाटप, आपत्कालीन मदत, एक पेड मॉं के नाम, ब्लड इन नीड यांचा समावेश होतो.मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे. परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते. समाजात मायक्रोसाइटिक, ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिय, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर, अशा गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना वेळीच रक्त मिळाल्याने त्यांचे प्राण वाचते.
रक्तदान केल्यामुळे 48 तासात शरीरात ताजे रक्त निर्माण होते. उत्साह वाढतो. नियमित रक्तदान केल्याने रक्तदाब कोलेस्ट्रॉल व हृदयविकाराचे प्रमाण कमी होते. तरी समाजातील सामाजिक संस्था महाविद्यालय शैक्षणिक संस्था शाळा कॉलेज व समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
