आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भरडधान्य खरेदीचा शुभारंभ

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव:- तालुक्यातील फर्दापूर येथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा तसेच भरडधान्य पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आज आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फर्दापूर ता. सोयगाव येथे खरीप पणन हंगाम २०२५-२६ शासकीय आधारभूत किंमत अंतर्गत भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.शुभारंभप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला. भरडधान्ये ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून बदलत्या हवामान परिस्थितीत ही पिके कमी पाण्यात व कमी खर्चात उत्पादन देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच भरडधान्य शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केलेला या खरेदी केंद्रामार्फत मका,ज्वारी,बाजरी,आदी भरडधान्यांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार असून त्याचा लाभ मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.फर्दापूर येथील शासकीय गोडाऊन येथे आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार मका, ज्वारी, बाजरी या सारखे भरडधान्य खरेदी केल्या जाणार आहे.फर्दापूर येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अनेक दिवसाची मागणी होती.आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक दारासिंग चव्हाण,माजी जि. प.सदस्य गोपीचंद जाधव जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, विलास वराडे,उस्मान खा पठाण फिरोज खा पठाण,राधेश्याम जाधव,रंगनाथ वराडे, आली खा शब्बीर खा,भीमा बोराडे, शेख मुक्तार,शेख जाकेर,आरिफ शाह,
अक्षय काळे,संतोष बोडके,कबीर शाह कुणाल राजपूत,हर्षल काळे,रईस खान,
उस्मान खान शेर खा,विजय तायडे, वसंत चव्हाण,मकसूद कादरी, इरफान शेख, सुपडू पाटील, राजेश दिंडे, सय्यद अजीम, विनोद राठोड,शफिक पठाण, उमर पठाण, सय्यद फारुख,कृउबा समितीचे सचिव विश्वास पाटील आदिंसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
